Chandrpur News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

Adity Thackeray

Chandrpur News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अज्ञात आरोपींकडून युवासेना शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. शिवा वझरकर (Shiva Vazarkar) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Maratha Andolan । नवी मुंबईत जरांगे पाटील दाखल, आज मोठा निर्णय होणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात घडली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर यांचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil । जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची हत्या झाल्याची माहिती समजताच शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. माहितीनुसार, मित्रांसोबत झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या या घटनेचा अधिकच तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची मोठी फसवणूक? झोपेत असताना कागदपत्रांवर घेतली सही?

Spread the love