अगामी लोकसभा निवडणूक 2024 ( Loksabha Election 2024) साठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. यामध्येच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा तर शिवसेना शिंदे गटाला 48 जागा असं वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यांनंतर अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा
बच्चू कडू म्हणाले, “बावनकुळेंनी केलेलं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे की, आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची का नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार याविषयी अजून काहीच ठरलेलं नाही”. असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
ब्रेकिंग! ‘या’ देशाने देखील घातली टिकटॉक अॅपवर बंदी
त्याचबरोबर, बच्चू कडू पुढे म्हणाले, ” गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आताच सांगता येत नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यभर पुन्हा एकदा पाऊस थैमान घालणार, हवामान विभागाची माहिती