Czech Republic Firing । धक्कादायक! विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार, १५ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

Czech Republic Firing

Czech Republic Firing । मागील काही काळापासून काही माथेफिरूंकडून अंदाधुंद गोळीबार (Attack) होऊन त्यात निरपराध नागरिकांचा बळी जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हल्ली हे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यापीठात (Charles University Attack) अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असून यात १५ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Bus Accident । इंदापूरमध्ये बसचा भीषण अपघात! एक शिक्षक ठार तर विद्यार्थी जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात (Charles University of the Czech Republic) ही घटना घडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हल्लेखोरदेखील या घटनेत ठार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सरकारी यंत्रणांकडून या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर (Social media) हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात विद्यार्थी गोळीबारातून आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत.

तुम्ही YouTube वरून अधिक पैसे कमवू शकाल, भारतीयांसाठी नवीन फिचर सुरु

परंतु, या हल्ल्याचा हल्लेखोर कोण होता? हल्ल्यामागचा हेतू काय? याची माहिती समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले परंतु, हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबार केला. हल्ल्यात हल्लेखोरही जखमी झाला होता. रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला.

LPG Price Reduced । आनंदाची बातमी! गॅस सिलिंडरचे दर कमी झाले; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

Spread the love