
सध्या आयटी (IT) कंपन्या खूप चर्चेत आहेत. या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यावर चांगला पगार मिळतो म्ह्णून अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये (Pune) येऊन आयटीचे क्लास करत आहेत. मात्र, आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी खोटे अनुभवपत्र देणाऱ्या काही खासगी क्लासेसनी पुण्यात धुमाकूळ घातलाय.
आपल्याला चांगली नोकरी मिळेल या आशेने राज्यभरातून अनेक विद्यार्थी नोकरी मिळेल या आशेने पुण्यामध्ये येत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांची फसवणूक होऊन त्यांचे करिअर देखील धोक्यात येत आहे.
गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
नेमका प्रकार काय?
एका परिचित क्लासेस मधील शिकणारी विद्यर्थिनी सांगते की, “या क्लासेसवाल्यांनी आमच्याकडून ४२ हजार रुपये घेतले आहेत. मात्र, आम्ही एवढे पैसे भरून देखील सॉफ्टवेअरमधील अटॉमेशन, एसक्यूएल किंवा मॅन्युअल टेस्टिंगचे प्रशिक्षण आम्हाला मिळाले नाही. या क्लासवाल्यांनी आम्हाला बनावट अनुभवपत्र दिल्यामुळे आमचे भविष्य धोक्यात आहे. क्लासवाल्यांनी निदान आमचे पैसे तरी माघारी करावेत.”