मागील अनेक दिवसांपासून नागराज मंजुळे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट विशेष चर्चेत आहे. (Ghar Banduk Biryani) ७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची आता दुसऱ्या आठवड्यात एन्ट्री झाली आहे. दरम्यान या आठवड्यातील सलग सुट्ट्या पाहता सिनेरसिकांसाठी घर बंदूक बिर्याणीच्या टीमने विशेष ऑफर दिली आहे.
काल असलेली आंबेडकर जयंती, आजचा शनिवार व उद्याच्या रविवारची सुट्टी लक्षात घेता चित्रपटाच्या टीमने खास विकेंड ऑफर दिली आहे. यामुळे या विकेंडला प्रेक्षक अगदी 100 रुपयांत ‘घर बंदूक बिर्याणी’ पाहू शकतात. (Weekend Offer) यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घर बंदूक बिर्याणीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
खोपोलीच्या अपघाताबाबत जखमी प्रवाशांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली धक्कादायक माहिती!
खरंतर प्रदर्शनापूर्वीपासूनच नागराज मंजुळे ( Nagraj Manjule) यांचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांच्यासारखी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटातील गाणी देखील हिट झालेली आहेत.
अजित पवार भाजपमध्ये जाणार? नाना पटोले स्पष्टच म्हणाले, “त्यांच्या मनात नेमकं…”