Agriculture Land । जमिनीची खरेदी करण्यापूर्वी एकदा तपासून पहा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर याल अडचणीत

Check 'these' important things before buying land, otherwise you will be in trouble

Agriculture Land । ‘वावर हाय तर पॉवर हाय,’ असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अनेकांना खूप वडिलोपार्जित जमीन (Land) असते, तर अनेकांना एक गुंठेही जमीन नसते. जमीन कमी असल्यामुळे अनेकजण ती खरेदी करतात. परंतु जमिनीची खरेदी करताना तुम्हाला काही गोष्टी तपासून पाहाव्या लागतात. कारण अलीकडच्या काळात फसवणुकीचे (Land Fraud) प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (Latest Marathi News)

धक्कादायक! ज्या बोटांनी नरेंद्र मोदींना मतदान केले तीच बोटे छाटली, जाणून घ्या नेमकं प्रकरण

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

जमिनीच्या गटाचा नकाशा

जमीन खरेदी करण्यापूर्वी एकदा त्या जमिनीच्या गटाचा नकाशा पाहावा. त्यामुळे तुम्हाला जमिनीची हद्द समजेल. तसेच तुम्हाला जमिनीशेजारी असणारे गट नंबर समजायला मदत होते. (Land Buying Tips)

Accident News । हृदयद्रावक! अपघातानंतर बसला आग, होरपळून १६ प्रवाशांचा मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी

खरेदी खत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून खरेदीखत करून घ्यावे. तुम्हाला पुढे कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

Gold Silver Rate Today । खरेदीची सुवर्णसंधी! सोन्यासह चांदीच्या भावात कमालीची घसरण, सराफा बाजारात खरेदीसाठी लागल्या रांगा

भूधारणा पद्धत

सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धतीची नोंद करण्यात येते. त्यामुळे खरेदी करणारी जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, हे समजू शकेल.

Mushroom Farming । लाखोंची कमाई करायची असेल तर करा मशरूमची लागवड, सरकारकडूनही मिळेल आर्थिक मदत

सातबारा आणि फेरफार उतारा

संबंधित गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा घेऊन ती जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीचीच आहे का ते एकदा पाहावे. तसेच जुना मालक, मयत व्यक्ती यांची नावे त्यावर असल्यास ती काढावी. त्या जमिनीवर कोणतेही कर्ज नसावे. फेरफार आणि आठ-अ उतारे बारकाईने तपासावे.

KCC । अवघ्या 2 मिनिटात मिळवा किसान क्रेडिट कार्ड! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

शेतातील रस्ता

खरेदी करणाऱ्या जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता आहे की नाही याची एकदा खात्री करावी. नाहीतर तुम्हाला भविष्यात अडचण येईल. समजा जमीन बिनशेती असल्यास जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशात दाखवला जातो.

Onion Price । कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, पुन्हा घसरले दर

Spread the love