Chhaava Box Office Collection Day 1 । ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिल्याच दिवशी 31 कोटींची ऐतिहासिक कमाई

Chhaava Box Office Collection Day 1

Chhaava Box Office Collection Day 1 । अभिनेता विकी कौशल स्टारर ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर धूम मचवली. रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने 31 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे ‘छावा’ 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांच्या ओपनिंग डे कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले. सध्या सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे, आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

Pune Mahanagarpalika Recruitment 2025 । पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी – 80,000 पगार, थेट मुलाखत प्रक्रियेने निवड!

‘छावा’ सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहेत. त्याने या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, ज्याचे परिणाम सिनेमाच्या यशावर दिसून येत आहेत. या सिनेमात रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, आणि डायना पेंटी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाचा बजेट 130 कोटी रुपये आहे.

Indian Postal Department । भारतीय डाक विभागात 21,413 पदांसाठी भरती – अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025

सिनेमाची कमाई केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांमध्येही प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या इतर सिनेमांपेक्षा ‘छावा’ ने अधिक कमाई केली आहे. ‘विदामुयार्ची’ आणि ‘स्काय फोर्स’ या सिनेमांनी अनुक्रमे 26 कोटी आणि 15.30 कोटी रुपयांची कमाई केली होती, पण ‘छावा’ने त्यांना मागे टाकले.

Tukaram Bidkar । अजितदादांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचे अपघाती निधन

आता येत्या शनिवार आणि रविवारच्या दिवसांत सिनेमाला अधिक चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या यशामुळे भविष्यात सिनेमा किती मोठा विक्रम करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Accident News । धक्कादायक! तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अपघात, 3 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी

Spread the love