Maratha Reservation । जालना : मराठा आरक्षणाचा (Reservation) पेच अजूनही सुटला नाही. मराठा समाज आपल्या मागणीवर ठाम आहे. अशातच आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा (Maratha Protest) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच संदर्भात आज त्यांची जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा सुरु आहे. असंख्य लोकांनी सभेसाठी गर्दी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
“सरकारने आम्हाला येत्या 10 दिवसात आरक्षण द्यावे. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे एकाच बाजारातले आहेत. मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. ते काय आहेत, हे सगळ्या राज्याला चांगलेच माहीत आहे. भुजबळांचा विषय तर चिल्लर झाल्याने ते बारीक लेकरासारखं काहीही बोलत आहेत. त्यांच्या वयाचा आता ताळमेळ बसत नसेल त्यामुळे ते आता बरळत आहेत,” अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या सभेवर प्रश्न उपस्थित केला आहे. भुजबळ यांनी 100 एकरात होणाऱ्या सभेसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च येतो, इतके पैसे कोठून आले? असा प्रश्न छगन भुजबळांनी विचारला होता. त्यावरून आता मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत.