Chhagan Bhujbal । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी अद्याप कायम आहे. पक्षातील तीन बड्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतरही एकाही नेत्याने त्यांची समजूत घालण्यासाठी भेट घेतली नाही. यामुळे भुजबळ पक्षात एकाकी पडले आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावरून भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे.
Mumbai News । धक्कादायक! कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण
सूत्रांच्या मते, भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत, आणि यासाठी ते मुंबईत दोन दिवस त्यांचे समर्थक आणि ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार आहेत. छगन भुजबळ यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये त्यांना अनदेखी केली जात आहे. नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भुजबळ यांनी अजित पवारांवर टीका केली होती आणि त्यांच्या एकाधिकारशाहीवर हल्ला चढवला होता.
Baramati News । बारामती हादरली! मावस बहिणीशी बोलल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला
यानंतरही राष्ट्रवादीतील एकाही आमदार किंवा मंत्र्याने भुजबळ यांना भेटायला गेले नाही, ज्यामुळे त्यांना पक्षात एकाकी असल्याचे जाणवते आहे. भुजबळ जर अजित पवार गटापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतात, तर त्यांच्या समोर तीन पर्याय आहेत. एक म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणे, दुसरे म्हणजे भाजपमध्ये सामील होणे, आणि तिसरे म्हणजे ओबीसींचे देशव्यापी संघटन उभं करणे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी भुजबळ यांना त्यांच्या गटात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. भुजबळ हे तळागाळातून आलेले नेतृत्व असल्याने, त्यांच्या पक्षात योग्य सन्मान होणे आवश्यक आहे, असे लंके यांनी म्हटले आहे.