![Manoj Jarange](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/01/Manoj-Jarange-4-1024x576.jpg)
Chhagan Bhujbal । राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha reservation) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण ओबीसी समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी (OBC) संघटनांकडून कडाडून विरोध केला आहे. आता पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे.
LPG Price Today । ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर
छगन भुजबळ म्हणाले, “हिमंत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. हिमंत असेल तर मंडल आयोगाला संपवून दाखवा अस देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता यावरूनच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला आहे.
Gyanvapi Masjid । कोर्टाचा मोठा निर्णय! ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान दिले आहे. ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनचे ॲड. मंगेश ससाणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून “सगेसोयरे “व” गणगोत “यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेतर्फे कोर्टात आव्हान दिले आहे.
Bus Accident । चालकाच्या चुकीमुळे बसचा भीषण अपघात, २० प्रवाशी जखमी