Chhagan Bhujbal । मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मैदानात उतरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ओबीसींच्या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळ देखील मैदानात उतरले आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये वाद होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. (Public meeting of Chhagan Bhujbal in Indapur)
Pune Fire News । सर्वात मोठी बातमी! आगीच्या घटनेने पुणे हादरलं! सहा जणांचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर छगन भुजबळ मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सभा घेत आहेत. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळ यांची पहिली ओबीसी एल्गार सभा पुणे जिल्ह्याच्या इंदापूर मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी एक वाजता ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे.
या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास दीड लाख ओबीसी बांधव येण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. इंदापूर शहरालगत असलेल्या शंभर फुटी मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मैदानामध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा झाली होती त्याच मैदानात ओबीसी मेळावा होत आहे.
माहितीनुसार या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.
Ajit Pawar । एकनाथ शिंदे नाराज? फडणवीस यांच्या लेटर बॉम्बनंतर महायुतीत अजित पवार एकटे