Chhagan Bhujbal । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal । राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते पक्षांतर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच मंत्री छगन भुजबळ सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Sharad mohol murder case | शरद मोहोळ याच्या हत्येनंतर पत्नीने केला धक्कादायक दावा

त्यांच्या या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिउत्तर दिल आहे. आपल्या पक्षात मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझी इथे घुसमटही होत नाही. असं भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मला अजून याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही मात्र माझ्या आधी त्यांना ही माहिती कशी मिळाली हेच मला समजत नाही असं भुजबळ म्हणाले आहेत.

Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; १५ जण गंभीर जखमी

त्याचबरोबर त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेचा देखील समाचार घेतला आहे. या टिकेला भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड काय म्हणाले ते काल मी पण ऐकलं. मला ते ऐकून वाईट वाटलं. त्यांनी जी भाषा वापरली ती बरोबर नाही. मी देखील शिवसेनेमध्ये होतो. तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये शिकला त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सीनियर प्रोफेसर होतो. अशा शब्दात भुजबळ यांनी गायकवाड यांना टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis । अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, ‘गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी…’

Spread the love