
Chhagan Bhujbal । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी अनेक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. यामध्येच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक मध्ये आहेत. या ठिकाणी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते पाहणी करत आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याला नाशिक मधील मराठा समाजाने कडाडून विरोध केला आहे.
नाशिक मधील येवला या ठिकाणी आज सकाळपासूनच मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध केला जात आहे. मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत गोमूत्र देखील शिंपडल आहे. येवल्याच्या सोमठानदेश गावातील ज्या मार्गावरून छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडल्याची माहिती समोर आली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. मात्र या पाहणी दरम्यान छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलन करत भुजबळांचा निषेध नोंदवला आहे.
Crime । काय सांगता? तब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली; घटना वाचून बसेल धक्का
माहितीनुसार छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा संपल्यानंतर ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ परतले त्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडल आहे. आंदोलकांनी अर्धनग्न होत काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला आहे. यावेळी छगन भुजबळ गो बॅक अशा घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.
Ajit Pawar । मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत