Manoj Jarange । “आम्हाला आव्हान देऊ नका, नाहीतर…”, जरांगेंनी दिला धनगर आरक्षणाचा उल्लेख करत भुजबळांना इशारा

Manoj Jarange

Manoj Jarange । राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha reservation) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पण ओबीसी (OBC) समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कडाडून विरोध केला आहे. ओबीसींनी संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली आहे. (Latest marathi news)

Chhagan Bhujbal । बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या भूमिकेला काँग्रेस आणि अजित पवार गटाचा पाठिंबा

‘सरकारने मराठा समाजाला मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू केलं आहे’, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील (Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी आव्हानं देऊ नये. नाहीतर काहीही होऊ शकत. आम्हाला गोरगरिबांचं वाटोळं करून आम्हाला आमची पोरं मोठी करायची नाहीत. भुजबळांना ओबीसींची काळजी नाही. त्यांना फक्त त्यांचा राजकीय स्वार्थ महत्त्वाचा आहे”, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे.

Maratha resevation । मोठी बातमी! ओबीसी संघटनांनी दिले मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान

“धनगर आरक्षणाबाबत (Dhangar reservation) मी मागे एकदा भुजबळांना भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. पण अजूनही त्यांनी त्याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. छगन भुजबळ आव्हानं देऊन स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सगळं आरक्षण घालवून बसतील.अध्यादेशाबद्दल काही दगाफटका झाला तर मंडल आयोगालाच चॅलेंज करणार आहे, यासाठी आपण वकीलांची लवकरच बैठक घेणार आहे,” असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Crime News । धक्कादायक! जनगणनेच्या बहाण्याने घरात शिरले आणि चाकूचा धाक दाखवत…

Spread the love