Site icon e लोकहित | Marathi News

Maratha Victory । मराठे सोपे नाहीत! आरक्षण मिळवून दाखवलं, जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर नाव न घेता निशाणा

Maratha Victory

Maratha Victory । मुंबई : सध्या मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला सगळ्यात मोठे यश आले आहे. राज्य सरकारने (State Govt) मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. (Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil)

Maratha Aarakshan । मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? पाहा संपूर्ण यादी

“मराठे सोपे नाहीत, समाजाला आरक्षण (Maratha reservation strike) मिळू देणार नाही असे म्हणत होते. पण, आरक्षण मिळवलं का नाही. तुम्ही पुढे पण अडचणी आणा आम्ही तेव्हाही लढू. अनेकजण म्हणायचे मुंबईत जाऊन रिकाम्या हाताने परत येणार. पण, आम्ही शेवटी आरक्षण घेऊनच मुंबईतून परत जात आहे”, असे म्हणत जरांगे यांनी छगन भुजबळ यांना नाव न घेता टोला लगावला आहे. (Latest Maratha Reservation Update)

Manoj Jarange । सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

जरांगे पुढे म्हणाले की, “कितीही सापाळे रचू द्या, कितीही आरोप करु द्या. पण, मराठा समाज माझ्या पाठिशी ठाम उभा होता. मुंबईत आल्यावर देखील सापाळे रचला होता. घाबरायचं नाही असं मी ठरवलं होत काहीही झालं तरी आरक्षण मिळवूनच परत यायचं. आरक्षणासाठी मराठा समाजाने खूप संघर्ष केला आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Maratha Reservation । ब्रेकिंग! सरकारकडून मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य, मुंबईत मराठ्यांचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील सोडणार उपोषण

Spread the love
Exit mobile version