Chhagan Bhujbal । राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. ही मुलाखत रविवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याचबरोबर यावेळी त्यांनी 2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री पद दिले असते तर पक्ष फुटला असता असे मोठे वक्तव्य केले. आता त्यांच्या या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतला आहे.
Pune News । पुण्यात भरदिवसा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार; सोन्याच्या दुकानावर दरोडा
याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसकडून आपणास तसेच सांगण्यात देखील आले होते. असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Navi Mumbai । नववी नापास तरुणाने युट्युबवर पाहून छापल्या नकली नोटा; पोलिसांना समजताच…
माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, “ज्यावेळी मी शरद पवार यांच्यासोबत गेलो त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये म्हणून सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ असे देखील सांगण्यात आले. मात्र मी त्यावेळी शरद पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो. असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरु