Chhagan Bhujbal । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal । सध्या राजकीय व्यक्ती तसेच सेलिब्रिटी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या देखील मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. (Latest Marathi News)

8GB रॅम, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा सह Poco C65 लॉन्च

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळताच त्यांच्या शासकीय निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा वाढवली आहे. मराठा समाजातील काही लोक मला जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेरील पोलिस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

Bageshwar Baba । मराठ्यांना आरक्षण मिळावं का? बागेश्वर बाबांनी केलं अत्यंत मोठं वक्तव्य

दरम्यान, मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्या ही आमची मागच्या अनेक वर्षापासून भूमिका आहे. मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका असं म्हणत छगन भुजबळ यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला विरोध केला. त्याचबरोबर ओबीसी समाजाने देखील याला विरोध करावा जर एकदा ओबीसी समाजाने आरक्षण गमावले तर ते पुन्हा मिळवता येणार नाही असे वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केले होते. त्यानंतर आता पुन्हा छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Karjat Accident News । भीषण अपघात, भरधाव कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; ३ जणांचा मृत्यू

Spread the love