Chhagan Bhujbal । बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या भूमिकेला काँग्रेस आणि अजित पवार गटाचा पाठिंबा

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal । राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha reservation) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण ओबीसी समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी (OBC) संघटनांकडून कडाडून विरोध केला आहे. ओबीसींनी संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली आहे. (Latest marathi news)

Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे यांना दुखापत, रद्द केले आठवड्याभराचे कार्यक्रम

अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या भूमिकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आपले समर्थन आहे, असे जाहीर केले आहे. इतकेच नाही तर अजित पवार गट (Ajit Pawar Group) देखील भुजबळ यांच्या भूमिकेला सहमत आहेत. भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात कोणतीही दरी नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Maratha resevation । मोठी बातमी! ओबीसी संघटनांनी दिले मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान

नुकतीच वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी समाजाच्या संघटनांची बैठक पार पडली. यावेळी मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबतची ही अधिसूचना काढली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

Crime News । धक्कादायक! जनगणनेच्या बहाण्याने घरात शिरले आणि चाकूचा धाक दाखवत…

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान दिले आहे. ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनचे ॲड. मंगेश ससाणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून “सगेसोयरे “व” गणगोत “यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेतर्फे कोर्टात आव्हान दिले आहे.

Ajit Pawar । राज्यसभा निवडणुकीनंतर होणार मोठा भूकंप? अजित पवार गटाने आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

Spread the love