Chhatrapati Sambhaji Nagar News । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar News) या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली.
Devendra Fadnavis । मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांबाबत भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले. यानंतर मुलांना रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. माहितीनुसार, वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात एक तलाव आहे. या तलावामध्ये पोहण्यासाठी चार मुले गेली होती. मात्र या चारही मुलांना पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी गाव घेतली.
Rohit Sharma । रोहित शर्माने मैदानामधेच आपल्या सहकाऱ्याला केली शिवीगाळ, पाहा video
त्याचबरोबर तहसीलदार देखील घटनास्थळी पोहोचले. या चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. मात्र या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मुलांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठी शोककळा परसली आहे.
Accident News । मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात