Chhatrapati Sambhajinagar । सापाचं नाव ऐकलं तरी अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. एकदा सापाने दंश केल्यानंतर जर तो साप विषारी असेल तर मनुष्य जगण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अनेक जण सापाला खूप भितात. सापाच्या भीतीपोटीत अनेक जण दगावल्याची देखील उदाहरणे आपण पाहतच असतो. मात्र सध्या असे एक प्रकरण समोर आले आहे जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Viral Video । विद्यार्थ्यासोबतच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोशूटवर शिक्षिकेन दिल उत्तर, म्हणाली…
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अजिंठा परिसरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलाला खेळत असताना साप चावला. साप चावल्यानंतर या चिमुकल्याने न घाबरता सापाला घेऊन थेट रुग्णालय गाठलं. साहेब मला हा साप चावला आहे उपचार करा. असं त्याने डॉक्टरांना सांगितलं. चिमुकल्याचे बोल आणि त्याच्या हातातील साप पाहून दवाखान्यातील डॉक्टर देखील चक्रावून गेले.
साप चावल्यानंतर अनेकांचा घाबरून मृत्यू होतो. अनेकजण सापाला घाबरतात मात्र या चिमुकल्याचे धाडस पाहून अनेक जणांनी अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. चिमुकला रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा या ठिकाणी एक १४ वर्षीय मुलगा दुपारचा खेळत असताना सापाने त्याच्या अंगठ्याला चावा घेतला यानंतर साप चावल्याची माहिती त्या चिमुकल्याने त्याच्या काकाला दिली. नंतर त्याच्या काकाने लगेच त्या सापाला पकडलं आणि चिमुकल्याला घेऊन रुग्णालय गाठलं यानंतर साहेब मला हा साप चावलाय असं म्हणत चिमुकल्याने हातातील साप डॉक्टरांना दाखवला यानंतर साप पाहून डॉक्टरही चक्रावले.
Nashik Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर थरार; प्रवाशांसोबत घडलं भयानक
यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचबरोबर, त्याला पुढील उपचारासाठी सिल्लोड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.