Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम अजूनही आपल्या सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांनी त्यांच्या शक्तीच्या आणि युक्तीच्या जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यांनी (Waghnakhe) स्वराज्यावर आलेल्या अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा काढला आणि आदिलशाहीला हादरा दिला ती वाघनखं आता महाराष्ट्रात आणण्याचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
येत्या 16 नोव्हेंबर रोजी ती वाघनखं मुंबईमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) दिली आहे. सध्या ही वाघनखं सध्या लंडनमध्ये असून ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. लंडनमधील ज्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखं आणण्यात येणार आहेत. मात्र त्या संग्रहालयाने करार करताना काही अटी देखील ठेवल्या आहेत. जाणून घेऊया त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं फक्त संग्रहालयात ठेवण्यात येतील. त्या कुठेही फिरवता येणार नाहीत.
- या वाघनखांचे इन्शुरन्स काढण्यात येणार आहे. जेणेकरून त्याची चोरी होऊ नये.
- याच्या सुरक्षेसंबंधित काय उपाययोजना करण्यात येणार आहे त्या सांगाव्यात.
- त्याचबरोबर त्याच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी.