Site icon e लोकहित | Marathi News

Chhava Movie | धक्कादायक! ‘छावा’ चित्रपटादरम्यान प्रेक्षकाने केला राडा; सिनेमागृहाचा पडदाच फाडला

chava Movie

Chhava Movie | विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असून, प्रेक्षकांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. चित्रपटाच्या सकाळी 6 वाजता होणाऱ्या शोच्या तिकीटांवरही तुफान गर्दी आहे. तथापि, एक घटना घडली ज्यामुळे चित्रपटाचे चांगले वातावरण गोंधळात पडले.

Ladki Bahin Yojana । फक्त याच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; अजितदादांनी दिली सर्वात मोठी अपडेट

गुजरातमधील भरूच येथील सिनेमागृहात ‘छावा’ चित्रपट पाहताना ऐका प्रेक्षकाने रागात पडदा फाडल्याची घटना घडली. रात्री 11:45 वाजता सुरू असलेल्या शो दरम्यान चित्रपटाचा महत्त्वाचा क्लायमॅक्स सीन सुरू होता. त्यात औरंगजेब शंभूराजांना कैद करतो आणि त्यांचा छळ करतो, अशा सीनमुळे प्रेक्षक चांगलाच भावनिक झाला आणि त्याने पडदा फाडला. यामुळे थिएटरमधील पडद्याचे नुकसान झाले.

Bjp । भाजप ठरला सर्वात श्रीमंत पक्ष; काँग्रेसच्या उत्पन्नात मोठी वाढ, ‘आप’ आणि बसपाला तोटा

थिएटर मालकाने या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती दिली, आणि त्यानंतर त्या प्रेक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रत्यक्षदर्शी प्रेक्षकांच्या माहितीनुसार, आरोपी प्रेक्षक शुद्धीत नव्हता. पडदा फाटल्यामुळे काही प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रीनवर चित्रपट दाखवण्यात आला, तर काहींना पैसे परत करण्यात आले.

Chhaava Box Office Collection Day 1 । ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिल्याच दिवशी 31 कोटींची ऐतिहासिक कमाई

Spread the love
Exit mobile version