अब्दु रोजिक म्हणजेच छोटा भाईजान हा कलाकार हिंदी बिग बॉस च्या 16 व्या सीझन मध्ये चांगलाच झळकला होता. या सीझनच्या दमदार खेळाडूंपैकी तो एक होता. बिगबॉस ( BigBoss 16) मधूम त्याने स्वेच्छेने एक्झिट घेतली नसती तर या शोच्या टॉप स्पर्धकांमध्ये तो नक्कीच असता. दरम्यान, बिग बॉस मधून बाहेर पडताच अब्दु रोजिकला एका आंतरराष्ट्रीय रिऍलिटी शो साठी ऑफर आल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
सुप्रिया सुळेंनी चक्क बैलगाडीतून सफर करत केली शेताची पाहणी!
युके मधील ‘बिग ब्रदर’ या आंतरराष्ट्रीय रिऍलिटी शोची ऑफर अब्दु रोजिकला मिळाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांच्या लाडक्या छोट्या भाईजानने ही ऑफर स्वीकारली असून तो ‘बिग ब्रदर’ या आंतरराष्ट्रीय रिऍलिटी शो मध्ये दिसणार आहे. यंदाच्या वर्षी जून किंवा जुलै मध्ये तो या शोचा भाग बनू शकतो. सुमारे पाच वर्षांनंतर यंदा ‘बिग ब्रदर’ हा शो कमबॅक करत आहे.
सोलापूरातील भाविकांचा तिरुपतीहून येताना अपघात! चार जणांचा जागीच मृत्यू
कामाच्या कमिटमेंटमुळे अब्दु रोजिक ( Abdu Rojik) याने 14 जानेवारीला बिग बॉस मधून एक्झिट घेतली. या शो मधून बाहेर पडताच त्याच ‘प्यार’ हे हिंदी गाणं प्रदर्शित झाले आहे. तसेच ‘किसी का भाई किसी की जान’ ( Kisi ka bhai kisi ki jan) या सलमान खानच्या अगामी चित्रपटात अब्दू दिसणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा चर्चेत; राजकीय बंडानंतर प्रथमच जाणार शिंदेंच्या बालेकिल्ल्यात