विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या कोल्हापूर ( Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी ग्रामपंचायत निवडणूकांमधील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार प्रकरणी कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
अजित पवारांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार शेवटी बोललेच; म्हणाले…
कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, तुम्ही सरपंच झालात म्हणजे गावचे कारभारी झाला असून तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे. गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच तुमचे काम आहे. तुम्ही लोकांमधून निवडून आल्यामुळे तुम्हाला मोठी संधी मिळाली आहे.
मोठी बातमी! मुंबईत बॉम्बस्फोट होईल, पोलीस कंट्रोलला धमकी देणारा फोन
मात्र, सरपंचांची निवड जर जनतेमधून होत असेल तर, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री ते थेट पंतप्रधानांपर्यंत (Prime Minister) सर्वांची निवड थेट जनतेमधून व्हायला हवी. असे देखील अजित पवार ( Ajit Pawar) यावेळी म्हणाले आहेत.
उर्फी जावेदने घेतली आजोबा जावेद अख्तर यांची भेट; फोटो शेअर करत म्हणाली…
याशिवाय सर्व सरपंचांनी केंद्राच्या, राज्याच्या, जिल्हापरिषदेच्या विविध योजना राबवून सरपंचांनी लोकांसाठी कामे करायला हवीत. तसेच सरपंचांनी सीएसआर निधी देखील मिळवण्याचा प्रयत्न करावा. याबाबत अजित पवार यांनी सरपंच व सदस्यांना माहिती दिली.
“राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख”; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली खंत