गेल्या सात दिवसांपासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी संप पुकारला होता. आता तो मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये संप करणाऱ्यांची प्रमुख मागणी ही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी होती. आता याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी संप मागे घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे.
बिग ब्रेकिंग! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
एकनाथ शिंदे म्हणाले, आज माझ्या समवेत संबंधित संघटनांची बैठक झाली. यावेळी या बैठकीमध्ये सरकारच्या आव्हानांना कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त करून त्यावर लवकरात लवकर निर्णय देण्यात येणार असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
पठ्ठ्याचा नादच खुळा! चक्क बायकोच्या वाढदिवसासाठी ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम
दरम्यान, संपकऱ्यांच्या मागणीसाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली असून येत्या तीन महिन्यात याबाबत अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत असं समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे.