पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवाज २ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी एकनाथ शिंदेनी काही महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच जिल्ह्यांची पाहणी आणि विकासकामांचा आढावा देखील घेतला. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पुरंदर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखील पाहणी केली.
एकनाथ शिंदेनी आज पुणे दौऱ्यादरम्यान पुरंदर तालुक्यातील तुकाई दर्शन टेकडी येथील फुरसुंगी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन पाहणी केली. शहरातील या अत्यंत महत्त्वाचा पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाला संबंधित सूचना देखील दिल्या.
आज पुणे दौऱ्यादरम्यान पुरंदर तालुक्यातील तुकाई दर्शन टेकडी येथील फुरसुंगी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन पाहणी करत
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 2, 2022
शहरातील या अत्यंत महत्त्वाचा पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाला संबंधित सूचना दिल्या. pic.twitter.com/hR2iFE2nIe
यावेळी, खासदार श्रीरंग बारणे,आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे,अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पुणे मनपाचे पाणीपुरवठा मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.
पुणे दौऱ्यांतर्गत विभागीय आढावा बैठक पार पडल्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघत असताना माझी नजर विभागीय आयुक्तालय कार्यालयाबाहेर कामगार पुतळा येथील मेट्रो प्रकल्प बाधित आंदोलनकर्त्यांकडे गेली. ताफा तात्काळ थांबवून त्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. pic.twitter.com/HziXoCNWxS
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 2, 2022