
महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार असताना मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही दिवसापूर्वी केला होता. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनीही याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाने घेतली दखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले (Chief Minister Eknath Shinde), गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस (Girish Mahajan and Devendra Fadnavis) यांच्या अटकेच्या चर्चा सुरू होत्या, त्याचा मी साक्षीदार आहे, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
मर्सिडीज कार पेक्षा महाग आहे ‘हा’ 50 लाख किंमतीचा बैल; तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर
“आमच्यावर विरोधकांना धमकवल्याचा आरोप केला जातोय. मात्र, ठाकरे सरकारने (Thackeray Govt) अनेक नेत्यांना अटक केली. कंगनाच घर पाडलं. केतकी चितळेला अटक केली. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी मी तिथे होतो. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना आत घाला, या वक्तव्याचा मी साक्षीदार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.