मुंबई : राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले. आता मुंबईसोबत काही महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकादेखील होण्याची शक्यता असताना राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने हालचाली करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपा आणि मनसे यांच्या युतीची जोरदार चर्चा चालू असताना आता दुसरीकडे राज ठाकरेंना भेटायला जाणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे या भेटीवरून अनेक राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.
Mumbai: मुंबईत मनसेच्या नेत्यांकडून वृध्द महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
आता आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनांतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, मागच्या दोनच दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी “मी कौटुंबिक कारणांसाठी ही भेट घेतली होती. त्यातून राजकीय अर्थ काढू नये. पण, युतीबाबतचा निर्णय आमचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी, अमित शाह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस हे घेतील”, असं यावेळी बावनकुळे म्हणाले होते.
Narendra Modi: पंतप्रधान मोदींसह या नेत्यांवर अमेरिकेत गुन्हा दाखल, कारण..
मुख्यमंत्र्याना या भेटीबद्दल विचारण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज ठाकरेंसोबत कोणत्याच प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. “सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं होत. प्रकृतीची विचारपूस केली. असे एकनाथ शिंदे म्हणाले.