आयोध्येतून परतताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड वर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन घेतल्या भेटी

Chief Minister Eknath Shinde on action mode as soon as he returns from Ayodhya; Direct visits to dams of affected farmers

मागील चार दिवसांत राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर गेले होते. राज्यातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री देवदर्शनाला गेले यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आयोध्या ( Aayodhya) दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री ऍक्शन मोड वर आले असून त्यांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत. अवकाळी पाऊसामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

ब्रेकिंग! शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द

एवढेच नाही तर येत्या तीन दिवसांत सर्व पिकांचे पंचनामे करू. तसेच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले.

उर्फीने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘मला भाड्यानं घर पाहिजे पण कोणीही…”

आयोध्येत गेल्यानंतर आम्ही प्रभु श्रीरामांकडे बळीराजाचे संकट दूर व्हावे यासाठी साकडे घातले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी संबंधित विभागांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य, संजय राऊत एकनाथ शिंदे गटात येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *