मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदेनी पोलीस, अग्नीवर भरतीसाठी जे तरुण येतात त्यांच्या राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी आणि त्या ठिकाणी आरोग्य सेवांचा देखील पुरवढा करण्यात यावा असे आदेश सोमवारी दिले.
ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्या! एकनाथ शिंदेंच्या परिवहन खात्याला सूचना
अग्नीवर भरतीसाठी अनेक तरुण सहभागी होतात, त्यातील बरेच जण गरीब कुटुंबातील असतात. खूप लांबून लांबून ते भरतीसाठी येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊनये यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये भरती होईल त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका यामध्ये तरुणांची राहण्याची सोया करावी. त्याचबरोबर त्यांना नाश्ता, आरोग्य सुविधाही देण्यात याव्यात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Rohit Pawar: रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चाना उधाण
अग्नीवर भरतीसाठी तरुणांना या सोयीसुविधा मिळाव्या म्ह्णून आमदार प्रताप नाईक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. २१ वर्षीय तरुणाचा अग्नीवर भरती चाचणी दरम्यान मृत्यू झाल्याचा उल्लेख देखील सरनाईक यांनी या पत्रामध्ये केला होता.