उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Chief Minister Eknath Shinde reacts on Uddhav Thackeray's visit to Thane; said…

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे ( बाळासाहेब ठाकरे) मुख्य कार्यालय देखील ठाण्यातील टेंभी नाका येथेच आहे. अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचा नुकताच ठाणे ( Thane) दौरा पार पडलाय. दरम्यान उद्धव ठाकरे सुद्धा आज प्रजासत्ताक दिनी ठाणे दौऱ्यावर आहेत. आता यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंस्टाग्राम स्टोरीवरून कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा; लोखंडी स्टिक, लाकडी दंडक्याचा वापर करून केली हाणामारी

आज वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याबाबत त्यांना विचारण्यात आलं, यांबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ”लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो”, या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

दरम्यान, उद्धव ठाकरे आज (दि.26) प्रजासत्ताक दिनी ठाण्यामधील तलाव पाळी परिसरात एका शिबिराला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा दुपारी 12 वाजता सुरू होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत ते ठाण्यातच असणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे टेंभी नाका परिसरातील जैन मंदिरात देखील ते विशेष उपस्थिती दाखवणार आहेत.

प्रजासत्ताक दिनी हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडत केली आत्महत्या!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *