मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या मंत्रीमंडळासह आयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला वहिला आयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मागील अनेक दिवसांपासून हा दौरा चर्चेत होता. आयोध्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच विरोधकांवर निशाणा देखील साधला.
राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार? चंद्रकांत पाटील यांनी केले सूचक वक्तव्य…
आयोध्येमधील (Aayodhya) वातावरण राममय झाले असून मंदिराच्या गाभाऱ्यात मला वेगळीच वलये जाणवली. राम मंदिर हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी पाहिले होते. राम मंदिर हिंदुत्वाचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराच्या कामाला वेग आला असून मंदिराचे काम वेगाने होत आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यावेळी म्हणाले.
उर्फीच्या जीवनाची अजब कथा वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
तसेच आयोध्येत मी पहिल्यांदाच आलोय त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी माझे जंगी स्वागत झाले. माझ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे उत्तम नियोजन केले. यासाठी त्यांचे आभार. खरंतर राममंदिर हा राजकारणाचा विषय नाही. मात्र माझ्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होत आहे. त्यांना हिंदुत्वाची ऍलर्जी आहे. मात्र हिंदू धर्म धर्मांचा आदर करतो. तो सर्वांना सोबत घेऊन जातो. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारले आहे. यावेळी त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन ( Maharashtra Bhavan at Aayodhya) उभारणार असल्याची घोषणा केली.
नवीन गाडी चालावायला शिकण्यासाठी बाहेर गेले अन् गमावले प्राण; अपघातात बाप-लेकाचा मृत्यु