Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर, असा असेल दौरा

Chief Minister Eknath Shinde will visit Aurangabad today

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (16 सप्टेंबर) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांचा हा दौरा आज आणि उद्या (16 आणि 17सप्टेंबर) असा दोन दिवसांचा असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बहुप्रतिक्षित असं छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता. तसेच उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान मागील आठवड्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची पैठणमध्ये (Paithan) जाहीर सभा झाली. यावेळी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Sairat: सैराट फेम प्रिन्सला अटक होण्याची शक्यता; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

आज शुक्रवार (16 सप्टेंबर) दुपारी. 2.30 वा.औरंगाबाद विमानतळ येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असुन ते तेथून मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण करणार आहेत. तसेच दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण करणार असुन दुपारी 4.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. दरम्यान सायं. 05.30 वाजता विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट देणार आहेत.

राजगिरा भाजीच सेवन करताय? ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे

पुढे सायं 05.45 वाजता सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे प्रयाण करणार असुन सायं 6.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती दर्शवणार आहेत.सायं. 06.30 वाजता तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे जाणार असुन ते रात्री 07.15 वाजता शासकीय विश्रामगृह पोहचतील व तेथे मुक्काम करतील.

शरीरावर सुज येतेय? मग करा हे घरगुती उपाय, झटपट होईल सुज कमी

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (17 सप्टेंबर) सकाळी 06.30 वाजता मुख्यमंत्री शिंदे शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी 07.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 07.15 वाजता सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण करणार असुन सकाळी 07.35 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि शासकीय विमानाने हैदराबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

Rain: मुंबईसह रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *