Shrikant Shinde: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय”, श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

"Chief Minister Eknath Shinde works for 20 hours, it is visible in people's eyes", Srikanth Shinde slams opponents

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार फोडून बंड पुकारले होते. त्यानंतर शिंदे गटाने भाजपशी युती करून सत्ता स्थापन केली. या सत्तेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद फडणवीस (Devendra Fadanvis) हे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या कामाचे कौतुक केले आहे.खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय”, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.

Shinde-Fadnavis: ओबीसी शिष्यवृत्ती बंद! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

तसंच विरोधकांना जिथं-तिथं फक्त एकनाथ शिंदेच दिसतात. एवढच नाही तर विरोधकांच्या स्वप्नातही एकनाथ शिंदे येतात.
राज्यामध्ये जे सरकार आले ते मेजॉरिटीचं सरकार असल्याचं विरोधक म्हणत असतात. आणि मुळात त्यांचं ते कामच आहे. विरोधकांकडे विरोधी बाकावर बसल्याशिवाय दुसर काही करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करतात, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत.

Varun Sardesai: “उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या भीतीने भाजपाने शिवसेना फोडली” – वरूण सरदेसाई

पुढे श्रीकांत शिंदे म्हणाले की, आता शिंदेसाहेब चांगलं काम करत आहेत. शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या फिरले. फक्त गणेश उत्सवच नाही तर, त्याबरोबर शासकीय कामकाज सरकारचे निर्णय घेण्याचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले.दिवसातील 20 तास शिंदेसाहेब काम कस करू शकतात? असा प्रश्न अनेकांना पडलाय.तसेच एक एकनाथ शिंदे जास्त काम मरतात म्हणून या सगळ्या गोष्टी आता विरोधकांच्या डोळ्यांमध्ये खुपयला लागलेल्या आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. विशेष म्हणजे मी याआधीही सांगितलं आहे की ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है!, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Dadar: दादरमध्ये शिवसेना विरुद्ध शिंदे गटात राडा, गोळीबारात एक पोलीस जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *