मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Chief Minister Eknath Shinde) एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती (Recruitment of 30 thousand teachers) केली जाणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी शिक्षकांशी देखील संवाद साधला.
बळीराजा चिंतेत! कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाल्याने कलिंगड शेतातच पडून
याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट देखील केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा”. असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
बातमी कामाची! ‘या’ प्रगत टोमॅटोच्या जाती ठरतील फायदेशीर
गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यांचे आम्हाला समाधान वाटते. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे उदात्त कार्य मोकळेपणाने करावे. शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. pic.twitter.com/GhVFkJBcdj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2023
त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, “नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांची ३० हजार पदे शासन भरत असून लवकरच पदभरती केली जाईल.”
मोठी बातमी! पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार? निर्मला सितारमण यांचे संकेत