Eknath Shinde । जरांगे यांच्याबद्दल भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “आता त्यांची…”

Eknath Shinde

Eknath Shinde । मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उपोषणाला बसलेले मराठी नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनस्थळावरून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान,जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केले आहे.

Maratha Reservation । ब्रेकिंग! महाराष्ट्राचे राजकारण तापले, फडणवीसांवर आरोप केल्यांनतर भाजप आमदाराचा जरांगेंना इशारा

पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना देखील मी इगो ठेवला नाही. आता मनोज जरांगे यांची भाषा ही राजकीय होत चालली आहे. त्यांच्या मागे कोणीतरी आहे, असा वास येतोय. अशा प्रकारचे वक्तव्य ही संस्कृती नाही. त्यांना कोणी बोलायला लावतय का?’ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Maratha Reservation । जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे रवाना, सदावर्तेंनी केला हल्लाबोल; शरद पवारांचं नाव घेत म्हणाले…

त्याचबरोबर पुढे बोलताना बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले ”मराठा आरक्षणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी खूप प्रयत्न केले आहेत. असे खालच्या पातळीवर आरोप महाराष्ट्र सहन करत नाही. विरोधीपक्षाला अपेक्षित नव्हत की, एवढ्या लवकर आणि १० टक्के आरक्षण मिळेल. आम्ही रात्रंदिवस काम करतोय. सरकारने काय केलं नाही? ते सांगा असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis । “…त्यामुळे देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतायेत” जरांगेंच मोठं वक्तव्य

Spread the love