राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे- फडणवीस सरकार खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे. असे सांगितले आहे. चांगला निश्चय असणाऱ्यांचा नक्कीच विजय होतो. मात्र, यासाठी चांगला अभ्यास व आत्मविश्वासाची आवश्यकता असते. हे मला करायचे आहे असा आत्मविश्वास मनात ठेवा मग तुम्हाला कुणीच हलवू शकणार नाही. असे म्हणत यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.
महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू
शिंदे-फडणवीस ( Shinde- Fadanvis) सरकार हे शेतकरी, कामगार व शिक्षक यांचे सरकार आहे. यावेळी तुम्हाला हा आपला मुख्यमंत्री आहे असे वाटते का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला असता, मुलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी करण्यासाठी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. तसेच इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत.
‘या’ ठिकाणाहून निघणार महाविकास आघाडीचा महामोर्चा
तुमचा राजकारणाशी संबंध नाही. परंतु, तुम्हाला राजकारण बरोबर कळते. कोण राज्यकर्ते चांगले आहेत ते तुम्हाला बरोबर कळते. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, 75 हजार नोकरभरतीचा निर्णय, इन्फोसिस कडून मिळणारे चार हजार फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा; स्टेजवर झाली दगडफेक