कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. कांदा विकून शेतकऱ्यांना फक्त १ रुपया मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहील आहे. यामध्येच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे.
शेतकरी आजींनी यूट्यूबवरून कमावले लाखो रुपये; अन् आजींचा पहिला वहिला विमान प्रवास होतोय व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा आज विधानसभेत केली. ही फक्त घोषणा नाही प्रत्यक्ष देण्याचा निर्णय आहे. तुम्ही गाजर दाखवता आम्ही तर हलवा देतो, असा टोला देखील यावेळी एकनाथ शिंदेनी लगावला आहे.
“मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नाही”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “देशाच्या कांदा उत्पादनात आपला 43 टक्के हिस्सा आहे. मात्र इतर राज्यात कांद्याच उत्पादन वाढल्याने कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. त्यामुळे कांद्याला मिळणारा भाव शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; राऊतांचे थेट फडणवीसांना पत्र