राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. डिझायनर महिलेने अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भीषण अपघात! तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
यांनतर अनिक्षा या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर अनिल जयसिंघानी फरार आहे. आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रतिक्रिया देत त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
“तो वाढदिवसाचा केक कापणारचं होता तेवढ्यात घडलं असं की…”, पाहा व्हायरल VIDEO
एकनाथ शिंदे म्हणाले, “या प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानी हा महाविकास आघाडीतल सर्व पक्षात गेला होता. त्यामुळे त्याची सखोल चौकशी होणार आहे. जाणीवपूर्वक ही बदनामी करण्यात आली असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, याच्या पाठीमागे कोणी आरोपी असतील त्याचा नक्की शोध लागेल. असं देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.