मविआ विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय!

मुंबई | आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षाला हरवायचं असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं गणित मविआनं आखलं आहे. तर, दुसरीकडं मविआ विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे.

TMKOC आता मोठ्या पडद्यावर, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा!

भाजप-शिंदे विरोधात लढण्यासाठी मविआ एकत्र येणार आहे. त्यासाठी जंगी सभांचीदेखील तयारी झाली आहे. मविआची पहिली सभा संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल पासून होणार आहे. याच संभाना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटं मैदानात उतरणार आहेत.

आनंदाच्या शिध्यावरुन अजित पवारांची सरकारवर जोरदार टिका; म्हणाले…

यासाठी शिंदेंची रणनिती ठरली आहे. मविआची 2 एप्रिलची सभा संभाजीनगरमध्ये पार पडल्यानंतर मुख्यमंत्रीदेखील संभाजीनगरमध्ये ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहेत. मविआच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे ही यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरुवात 8 किंवा 9 एप्रिलला होईल.

खळबळजनक घटना! धावत्या रेल्वेत प्रवाशाला पेटवले

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला होता. उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतात त्याच ठिकाणी शिंदे सभा घेतात. असं विधान राज ठाकरेंनी केलं होत. आता यापुढे देखील असंच चित्र राहणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, या सभांचा प्रत्येक पक्षाला फायदा होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *