
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्याला प्रकल्प मिळतोय तर त्यात गैर काहीच नाही. पण महाराष्ट्राचा प्रकल्प दुसरीकडे जाणे हे खूप मोठं दुर्दैव आहे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
wheat: गव्हाची पेरणी करताय? तर मग या आहेत गव्हाच्या टॉप जाती; उत्पन्न निघेल भरघोस
लाखो तरुणांच्या नोकऱ्यांच्या संधी जाणार आहेत, त्यामुळे सरकारला विनंती आहे की राजकारण करण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन याकडे लक्ष द्यावे. असंही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कामाकडे लक्ष द्यावे. असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय.
Bachhu kadu: आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने सुनावली 14 दिवसाची कोठडी, कारण…
पुढे त्या म्हणाल्या की, वेदांता कंपनी ही गुजरातला जाणे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, सर्व पक्षांनी एकत्रितपणे केंद्र सरकारला विनंती करावी, ही गुंतवणूक महाराष्ट्राला ऑन मेरीट मिळाली आहे, ती ऑन मेरीटच राहिली पाहिजे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बाकी दौरे रद्द करून याकडे लक्ष द्यावे. असं देखील त्या म्हणाल्या.