Site icon e लोकहित | Marathi News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर

Chief Minister took a bold decision for onion farmers; Read in detail

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. कांदा विकून शेतकऱ्यांना फक्त १ रुपया मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहील आहे. यामध्येच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे.

शेतकरी राजा चिंतेत! राज्यात आजपासून अवकाळी पाऊस; ‘या’ ठिकाणी होणार गारपीठ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा काल विधानसभेत केली. ही फक्त घोषणा नाही प्रत्यक्ष देण्याचा निर्णय आहे. तुम्ही गाजर दाखवता आम्ही तर हलवा देतो, असा टोला देखील यावेळी एकनाथ शिंदेनी लगावला आहे.

धक्कादायक! कोपर्डीतील ५ वर्षीय चिमुकल्याचा बोअरवेलमध्ये पडून दुर्दैव मृत्यू

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “देशाच्या कांदा उत्पादनात आपला 43 टक्के हिस्सा आहे. मात्र इतर राज्यात कांद्याच उत्पादन वाढल्याने कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. त्यामुळे कांद्याला मिळणारा भाव शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार; 19 लाख कर्मचाऱ्यांचा असणार सहभाग

Spread the love
Exit mobile version