Site icon e लोकहित | Marathi News

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगींनी अयोध्येतील राम मंदिराबाबत दिली महत्वाची माहिती

Chief Minister Yogi gave important information about Ram temple in Ayodhya

अयोध्या (Ayodhya) ही प्रभू रामाची नगरी आणि हजारो महापुरुषांचे कार्यस्थान आहे. ही पवित्र भूमी हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येथे भगवान रामाचा (Lord Rama) जन्म झाला असुन ही रामजन्मभूमी आहे. महत्वाची बाब म्हणजे आचार्य धर्मेंद्र यांनी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली राम मंदिर (Ram temple) आंदोलनाला मोठी चालना दिली. विशेष म्हणजे आचार्य धर्मेंद्र (Acharya Dharmendra) यांचा पराक्रम खूप मोठा आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धर्मेंद्रांनी 50 वर्षे हिंदू समाजाचं सांस्कृतिक चळवळीत नेतृत्व केल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं.

प्रियकरासाठी चक्क मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्त्या

महत्वाची बाब म्हणजे योगी आदित्यनाथ गुरुवारी आचार्य धर्मेंद्र यांचे उत्तराधिकारी स्वामी सोमेंद्र यांच्या चादरपोशी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी योगी म्हणाले की, देशाची फाळणी झाली, तेव्हा संतांच्या आंदोलनात या खंडपीठाची मोठी भूमिका होती. राम मंदिर उभारणीचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढं नेलं आहे. दरम्यान आत्तापर्यंत राम मंदिराचं (Ram Temple Ayodhya) काम 50 टक्के पूर्ण झाल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Varun Dhawan: वरुण धवनने ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची केली घोषणा केली, सारा अली खानची अशी केली नक्कल

दरम्यान योगी आदित्यनाथ आणि खासदार बाबा बालकनाथ सकाळी 10.40 वाजता लखनौहून हेलिकॉप्टरनं जयपूर जिल्ह्यातील विराटनगर शहरामधील पंचखंड हनुमान मंदिर (भीम डुंगरी) जवळील हेलिपॅडवर उतरले. तसेच यावेळी त्यांनी 15 मिनिटं सभेला संबोधित केलं .योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मंचावर अल्वरचे खासदार महंत बालकनाथ उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांनी ज्या प्रकारे समर्थ रामदासांची परंपरा पुढं नेली, त्याच पद्धतीनं स्वामी सोमेंद्र आता आचार्य धर्मेंद्र यांची परंपरा पुढं नेत आहेत.

Cotton: दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाला मिळाला अकरा हजारांचा भाव, पहिल्याच दिवशी समाधानाचे वातावरण

Spread the love
Exit mobile version