
मुंबई : नवरात्र उत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर होता. मात्र यंदा कोरोना कमी झाल्याने निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नऊ दिवस उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.
कांद्यामुळे नाफेडला बसला मोठा फटका, ‘या’ जिल्ह्यातील कांदा सडला
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी. अशी विनंती करत एकनाथ शिंदेनी ट्विट शेअर केले आहे.
नोकरी शोधनाऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ कंपनी करणार 9000 जागांची मेगाभरती
या अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी होईल. सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये 18 वर्षावरील महिलांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतमध्ये शिबिरे घेण्यात येणार आहेत. दरम्यान, या अभियानाअंतर्गत नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही माहिती देण्यात येणार आहे.
अरे बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?