मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण (Kokan) या दोन विभागानला खास पर्यटनासाठी ओळखले जाते. अनेक ठिकाणाहून लोक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे हे दोन्ही विभाग जोडण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. महाबळेश्वर मधील राजभवन या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले.
PM Modi: पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून चाळीसगावमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपटी ते तापोळासाठी १५० कोटी आणि कास ते बामनोलीसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे. त्याचबरोबर याचा पर्यटन आणि उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे.
पुढे ते म्हणाले की, महाबळेश्वर (Mahabaleshwar) या ठिकाणी पार्किंगची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे. त्यामुळे दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरच्या शोभीकरणासाठी राहिलेला निधी द्यावा अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रतापगडाचे शोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात आलाय. दुर्गम भागातील लोक आणि विद्यार्थ्यांसाठी छोट्या मिनी बस देण्यात येणार आहेत. बोट क्लबला रीतसर परवानगी देणे, बार्ज खरेदी करणे, बेल एअरसाठी ३ कोटीचा निधी, असे जिल्ह्यासाठी अजून आवश्यक ते प्रयत्न करणार आहोत असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.