राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत राजकीय आरोप- प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात होत्या. यामध्ये राज्यातील इतर अडचणींकडे दुर्लक्ष झाल्याच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. अशातच अधिवेशन संपत आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी सरकारकडून विदर्भातील धान उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हॅक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला गेला आहे.
उर्फी जावेदचा अनोखा फॅशन सेन्स; नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर
विदर्भ मजबूत असेल तर राज्य मजबूत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ अतिशय महत्वाचा आहे. खनीज, उर्जा, पाणी, वन आणि शेती ही विदर्भाची बलस्थाने आहेत. विदर्भात झालेल्या समृद्धी महामार्गामुळे ( Samruddhi Highway) येणाऱ्या काळात येथील उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात क्रांती झालेली दिसणार आहे.
शिंदे-फडणवीस यांच्यात संघर्ष सुरू? ‘या’ कारणामुळे राज्यात चर्चांना उधाण
विदर्भासाठी करण्यात आलेल्या घोषणा
1) बुलढाणा ( Buldhana) जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता.
2) लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.
3) गोसीखुर्द येथे 100 एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारला जाणार.
4) गडचिरोली जिल्ह्यात 20 हजार कोटी गुंतवणुकीचा खनीज उत्खनन प्रकल्प सुरू होईल.
5) विदर्भातील औद्योगिक प्रगतीसाठी एकूण 44 हजार 123 कोटी रुपयांची गुंतवणूक.
6) नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला सुधारित 9279 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता.
7) धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर.
रानजनावरांची भीती, रात्रीची वीज, बळीराजाची परिस्थिती आहे तशीच!