
अनाथ म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर काय येत? कुठलाही कौटुंबिक आणि आर्थिक आधार नसलेली निराधार लेकरं असं काहीतरी चित्र समोर उभं राहतं. परंतु, यामध्ये सुद्धा परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन उभे राहणारे असतातच. बारामती येथील निरीक्षण गृह/बालसुधार गृहामधील एका अनाथ मुलाने देखील असंच काहीसं केलं आहे. येथील अनिल माणिक जाधव ( Anil Manik Jadhav) याने आत्मविश्वास, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर चक्क MPSC परीक्षेत यश मिळवून अधिकारी पद मिळवले आहे.
मोठी बातमी! कुकडी साखर कारखान्यावर उद्या परिसंवाद मेळावा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालात अनिल जाधव याची सहाय्यक कक्ष अधिकारी (A.S.O)मंत्रालय या ठिकाणी निवड झाली आहे. अगदी लहान वयात असताना अनिल बालसुधारगृहात दाखल झाला होता. उमलत्या वयात येथेच त्याच्यावर शैक्षणिक व सामाजिक संस्कार झाले. याठिकाणी त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीनंतर अनिलने आयटीआय चे शिक्षण घेऊन एका खासगी कंपनीत नोकरी केली.
मोठी बातमी! वडगाव बारामतीत जनावरांचा बाजार सुरू
तर दुसरीकडे त्याने MPSC चा अभ्यास देखील सुरू ठेवला. कुठल्याही परिस्थितीला दोष न देता झगडत अनिलने हे यश मिळवले आहे. आज एकीकडे आईवडिल लाखो रुपयांचा खर्च करत असून देखील मुले अभ्यास करत नाहियेत. तर दुसरीकडे अनिल सारख्या अनाथ मुलाने स्वतःच्या हिंमतीवर हे एवढे मोठे यश मिळवले आहे. यामुळे अनिल हा आजच्या तरुणांसाठी एक आदर्श बनला असून त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.
निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला गाईने शिकवला चांगलाच धडा; पाहा VIDEO