दिल्ली : भारतीय कफ सिरपमुळे पश्चिम आफ्रिकेतील (West Africa) देश गांबियामधील काही लहान मुले दगविल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने शंका उपस्थित केलीये. कप सिरपच्या काही नमुन्यांमध्ये केमिकल आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लहान मुलं दगावल्यानांतर केंद्र सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील या कप सिरपबाबत (cup syrup) कडक पाऊल उचलले आहे.
Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत एलोन मस्क बनला परफ्यूम सेल्समन
मेडेन फार्मास्युटिकल कंपनीला राज्य सरकारने मोठा झटका दिलाय. कंपनीचे विक्रीसाठी आणलेले कप सिरप पुन्हा कंपनीकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषधी नियंत्रक विभागाने महाराष्ट्रामध्ये विक्री झालेल्या कप सिरपच्या चौकशीचे देखील आदेश दिले आहेत.
मेडेन फार्मास्युटिकल (Maiden Pharmaceutical) याच कंपनीचे नाही तर राज्यसरकारने सर्वच कप सिरप, एक्सिपियंट, सॉलवेंट आणि लिक्विड ओरलच्या तपासण्याचे आदेश दिलेत. औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी इंडस्ट्रियल ग्रेड सॉलवेंटचा वापर केला आहे का नाही, याची देखील एफडीए तपासणी करणार आहे. आता याविषयी संपूर्ण तपासणी करण्यात येऊन अहवाल सादर करण्यात येईल.
धक्कादायक! पत्नीशी वाईट बोलणाऱ्या व्यक्तीवर पतीने केला चाकूने हल्ला