China Earthquake । ब्रेकिंग! चीनमध्ये मोठा भूकंप, घरे जमीनदोस्त झाली; शेकडो लोकांचा मृत्यू

China Earthquake

China Earthquake । उत्तर-पश्चिम चीनमधील गांसू आणि किंघाई प्रांतात ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे मृतांची संख्या 111 च्या पुढे गेली आहे. वृत्तानुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे गांसू आणि किंघाई प्रांतात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या किंघाई प्रांतातील हैदोंग शहरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून १२४ जण जखमी झाले आहेत.

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! विरोधी पक्षाच्या ३३ खासदारांचं निलंबन, नेमकं कारण काय?

चीनचे अधिकृत वृत्त माध्यम ग्लोबल टाईम्सने वृत्त दिले आहे की चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भूकंपाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार, बाधित लोकांचे योग्य पुनर्वसन आणि मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्यांसह लोकांची सुरक्षित सुटका करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Tanuja Hospitalised । अभिनेत्री काजोलच्या आई तनुजा यांची तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये केले दाखल; नेमकं कारण काय?

तीव्र भूकंपामुळे मोठे नुकसान

शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे अनेक घरे कोसळली आहेत. याशिवाय अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले आणि रस्त्यावर धावू लागले. चीनच्या गान्सू आणि किंघाई प्रांतात सोमवारी झालेल्या जोरदार भूकंपानंतर मंगळवारी (19 डिसेंबर) पहाटेपर्यंत बचावकार्य सुरूच होते.

Ranbir Kapoor । पठाण, गदरला मागे टाकत ‘ॲनिमल’ने केला विक्रम, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

भूकंपाची तीव्रता यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने 5.9 आणि शिन्हुआने 6.2 मोजली आहे. किंघाई प्रांताच्या सीमेजवळ असलेल्या गांसू प्रांतात असलेल्या, भूकंपामुळे काही स्थानिक गावांमध्ये वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पडलेले छत आणि इतर ढिगारा दिसत आहेत.

Accident News । ओव्हरटेक करणं आलं अंगलट, एका चुकीमुळे क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं

Spread the love