
पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections) वारे जोरदार वाहत आहे. या दोन्ही मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे भाजप तर दुसरीकडे महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तर प्रचारादरम्यान चांगलीच चढाओढ लागली आहे. शुक्रवारी (ता.24) संध्याकाळी पाच वाजता पोटनिवडणुकीचा प्रचार संपणार आहे. यामुळे आजची संध्याकाळ ही प्रचारासाठी शेवटची संध्याकाळ असणार आहे. म्हणूनच दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते आज प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.
“लग्न कधी करणार?”, प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण सध्या…”
या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) आज भिडे पुलापासुन पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर डेक्कनच्या नदीपात्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. तसेच काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे रोड शो करणार आहेत. यानंतर आदित्य ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चिंचेची तालीम इथे एकत्रित जाहीर सभा होणार आहे.
“शरद पवार यांना फडणवीसांची भीती वाटत होती”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठं वक्तव्य
तर दुसरीकडे दुसरीकडे चिंचवड मतदारसंघात सुद्धा प्रचारात चढाओढ सुरू आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार ( Ajit Pawar) यांचा रोड शो आणि सभा होणार आहे. तसेच राष्ट्रवादीकडून आज छगन भुजबळ, एकनाथ खडसे, जयंत पाटील हे नेते चिंचवडमध्ये प्रचार करणार आहेत. एवढेच नाही तर चिंचवड येथे रोहित पवार सुद्धा रोड शो करणार आहेत. दरम्यान चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संध्याकाळी सभा घेणार आहेत.